शनेश्वर जयंती
चा मोठा उत्साह ! शनिभक्तांनी लावल्या दर्शनासाठी रांगा... पहा कोठे ते
राहुरी ( प्रतिनिधी )
आज शनेश्वर जयंतीचा मोठा योग चालून आला आहे . शनि अमावस्या व शनी जयंती शनिवारच्या दिवशी आल्याने राहुरी येथील प्रसिद्ध शनेश्वर मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या .
शनि जयंती निमित्त मोठी तयारी केली असून दर्शनाला आलेल्या भाविकांना खिचडीचा प्रसाद देण्यात येत आहे .
दुपारी बारा वाजता युवा नेता हर्षदादा तनपुरे यांच्या हस्ते आरती संपन्न होत आहे . राहुरी येथील प्रसिद्ध राहू केतू के साथ शनी मंदिर दर्शनासाठी पंचक्रोशी सह बाहेरून देखील भाविक येत असून शनि महाराजांसह राहू कितवीला अभिषेक करण्यात येतो.
नाशिक येथील 2027 च्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने राहुरी शहरातील राहू केतू के साथ शनी मंदिराची देखील दखल घ्यावी , असे भावना आज शनि भक्तांनी प्रसिद्धी माध्यमांकडे बोलताना व्यक्त केली आहे .



Post a Comment
0 Comments